Ad will apear here
Next
‘जिओ’ला दोन वर्षे पूर्ण
डेटावापर मासिक २० कोटी जीबीवरून ३७० कोटी जीबी.
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ नेटवर्क’ने अत्यंत स्वस्त दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून दिल्यामुळे देशातील मासिक डेटावापर २० कोटी जीबीवरून तब्बल ३७० कोटी जीबीवर पोहोचला आहे. एकट्या जिओचे ग्राहक त्यामधील २४० कोटी जीबी डेटाचा वापर करत आहेत. मोबाइल डेटा वापराबाबत भारत १५५ व्या स्थानावावरून पहिल्या क्रमांकावर आला आहे. जिओच्या या क्षेत्रातील प्रवेशाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत डेटावापर केवळ वाढलेला नाही, तर जिओच्या आक्रमक धोरणांमुळे आघाडीच्या कंपन्यांमध्ये नवे दरयुद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. याचा थेट लाभ ग्राहकांना मिळत आहे.

अवघ्या दोन वर्षात जिओने मोबाईल सेवा पुरवठा क्षेत्राचे चित्र बदलून टाकले आहे. सेवेच्या सुरुवातीच्या काही महिन्यातच जिओ जगातील पहिले आणि एकमेव एक्साबाइट टेलीकॉम नेटवर्क बनले. ज्यामध्ये जिओ नेटवर्कवरून डेटाची वाहतूक प्रत्येक महिन्याला शंभर कोटी जीबीपेक्षा अधिक झाली. जिओचे फ्री व्हॉइस कॉलिंग हे वैशिष्ट्य ग्राहकांसाठी आकर्षणाचा विषय ठरले. त्यामुळे केवळ दोन वर्षांच्या कालावधीत जिओने २१ कोटी ५० लाख ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. महसुलाच्या बाबतीत जिओने दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. व्होडाफोनला मागे सारत जिओने २२.४ महसुली हिश्श्यासह दुसरे स्थान मिळवले आहे.

जिओचे नेटवर्क अत्याधुनिक, ऑल आईपी नेटवर्क आहे, ज्यात आठशे मेगाहर्ट्ज, अठराशे मेगाहर्ट्ज आणि २३०० मेगाहर्ट्ज बँडवर एलटीई स्पेक्ट्रम आहे. जिओ नेटवर्क लवकरच भारताच्या ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचणार आहे. जिओने केवळ १७० दिवसात १० कोटी ग्राहकांचा टप्पा पूर्ण केला. म्हणजेच दर सेकंदाला सात ग्राहक जिओने जोडले.२१ कोटींहून अधिक ग्राहक डिजिटल लाइफचा आनंद घेत आहेत. जिओच्या प्रवेशानंतर फेसबुक, यूट्यूब आणि इतर प्रमुख समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. त्यामुळे भारत गूगल आणि फेसबुकसाठी सगळ्यात सक्रिय अशी बाजारपेठ ठरली आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZTOBS
Similar Posts
रिलायन्स आता व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात येण्याच्या तयारीत मुंबई : मोफत डेटा, कॉल्स देत रिलायन्स जिओने मोबाईल सेवा क्षेत्रात धुमाकूळ घातला. आता व्हिडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रात धमाका घडविण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज सज्ज असल्याची चर्चा आहे. गुगल, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, स्पॉटीफाय आदी व्हिडिओ कंटेंट पुरविणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत रिलायन्स उतरणार आहे.
‘जिओ’ ला वार्षिक ७२३ कोटींचा नफा मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची मोबाईल सेवा प्रदाता कंपनी ‘जिओ’ने या आर्थिक वर्षात सातशे २३ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मार्च अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत तिने पाचशे १० कोटींचा नफा कमावला आहे.
फॉर्च्युन ‘चेंज दी वर्ल्ड’ यादीत रिलायन्स जिओ प्रथम मुंबई : फॉर्च्युनच्या नव्या ‘चेंज दी वर्ल्ड’ या जागतिक यादीमध्ये रिलायन्स जिओने पहिले, तर महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने २३वे स्थान मिळवले आहे. ‘अलिबाबा’सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकून ‘जिओ’ने अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत केवळ दोनच भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.
नवा जिओफोन केवळ ५०१ रुपयांत मुंबई : ‘जिओ’ने धमाकेदार मॉन्सून हंगामा ऑफर जाहीर केली असून, यामध्ये ग्राहकांना जुना फिचरफोन देऊन अवघ्या पाचशे एक रुपयांमध्ये नवा जिओफोन मिळणार आहे. २० जुलैला सायंकाळी पाच वाजल्यानंतर ही ऑफर सुरू होत आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language